शनिवार, ६ एप्रिल, २०१३

पवित्र व निर्मळ भक्ती

         

तुकाराम महाराजांनी जो देवाची भक्ती करतो,त्याचे सतत नामस्मरण घेतो अशा लोकांबद्दल म्हणले आहे कि "ज्यांच्या मनामध्ये देवाविशयी अखंड प्रेमभाव आहे व त्यांना मनापासून देव आवडत आहे असे लोक या पृथ्वीतलावर पवित्र व निर्मळ (सोवळे) आहेत. तसेच या जगात तेच भाग्यवान व धनवान आहेत"
          तुकाराम महाराजांना असे सुचवायचे आहे कि, जे लोक देवाची अंत:करणापासून पूजा करतात, त्याच्या भक्तीत तल्लीन होतात त्यांच्या मनात देवाविषयी अखंड प्रेमभाव आहे. देवावरील भक्तीपलीकडे त्यांना दुसरे काही दिसत नाही. त्यांना धन-दौलत,सुवर्ण अलंकारापेक्षा देव आवडत असतो. त्याची भक्ती आवडत असते. म्हणूनच काही लोक देवाच्या अवास्तव पूजेचा खोटा देखावा करून पवित्र व निर्मळ असल्याचे भासवतात. त्यापेक्षा देवाची मनापासून भक्ती करणारे, त्याच्यावर अखंडित प्रेम करणारे लोकच पवित्र व निर्मळ आहेत तसेच ते खरे भाग्यवान व धनवान आहेत. बाकी सारे ढोंगी व स्वार्थी आहेत. पवित्र व निर्मळ अशा लोकांनी केलेली सेवा, भक्ती देवाला पोचत असते.