शनिवार, ३० जुलै, २०११

आपुलिया हिता जो होय जागता|

आपुलिया हिता जो होय जागता धन्य माता पिता तयाचिया१

कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक तयाचा हरिख वाटे देवा२

गीता भागवत करिती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे३

तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही४
तुकाराम महाराज म्हणतात की,"जो आपल्या हिताविशई जागा आहे त्याचे माता-पिता धन्य आहेत। ज्य़ा कूलामध्ये कन्यापुत्र सात्विक होतात। त्यांचा देवाला आनंद वाटतो।" आत्ताच्या पीढ़ीबाबत हे विचार फार मोलाचे वाटतात कारण आत्ताची पीढ़ी भरकटलेली आहे। हित-अहिताचा विचारच करीत नाही। पैशाच्या मागे लागुन आत्ताच्या मुलान्मधिल सात्विकता नष्ट होत चालली आहे। चांगले आचरण करण्याऐवजी वैट मार्गाकडे(व्यसनाधिनतेकडे,हिंसात्मक मार्गाकडे) जात आहेत। आशा लोकांसाठी हा अभंग मोलाचा आहे। तुकाराम महाराज असे म्हणतात की,"जे गीता भागवत श्रवण करतात (या ग्रंथासाराख्या चांगल्या गोष्टींचे श्रवण करतात) व विठोबाचे अखंड चिंतन करतात त्यांची अखंड सेवा घडो।"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा