बुधवार, २६ ऑक्टोबर, २०११

अंतरीची घेतो गोडी|

अंतरीची घेतो गोडी पाहे जोड़ी भावाची १

देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा २

आपुल्याच वैभवे श्रुन्गारावे नीर्मल ३

तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रितीचे ४
तुकाराम महाराजानी देवाचे गोडवे गाताना म्हणाले आहे की, देव हा आपल्याविषयी भक्ताच्या अन्त:करनात असनार्या गोडीचे ग्रहण करतो व आपल्याविशायी भावाची जोड़ किती आहे हे पाहतो। याचा अर्थ देवाचे नाव घेताना ते वर-वर न घेता अंत:करनापासून घेतले पाहिजे। दिवसभर काम-धंदा सोडून वर-वर देवपूजा करण्यापेक्षा थोडावेळ जरी अंत:करनापासून नामस्मरण घेतले तरी देवाला गोड वाटते। तुकाराम महाराज असेही म्हणतात की "देव सोयरा दिनाचा" म्हणजे देव हा गरीबाबद्दल दयालु आहे व आपल्या ऐश्वर्याने त्याला नीर्मल करतो तसेच त्याच्याबरोबर जेवतो व आपल्याविषयीचे प्रेम देतो। देव कधीही उच्च- नीच असा भेदभाव करीत nआही।

पावले पावले तुझे आम्हा सर्व दूजा नको भाव होवू देवू १

जेथे जेथे देखे तुझीच पावूले त्रिभुवन संचले विट्ठाला गा २

भेदाभेद मते भ्रमाचे संवाद आम्हा नोक वाद त्यासी देवू ३

तुका म्हणे अनु तुजविण नाही नाभाहुनी पाहि वाड आहे ४
तुकाराम महाराजानी पांडूरंगाची एवढी भक्ति केलि की आता ते म्हणतात,"आता देवा,तुझ्याकडून सर्व काही प्राप्त झाले। तुझ्या भक्तितच सर्व काही मिळाले। त्यामूले तुझ्या भक्तिशिवाय दूसरा कुठलाही भाव अंत:करानत होवू देवू नका " तुकाराम महाराजाना पांडूरंगाच्या भक्तित सर्व सुख प्राप्त झाले। त्यामूले त्याना आता कुठल्याच भावाची इच्छा राहिली नाही। त्यामूले त्याना आता या त्रैलोक्यात पांडूरंगाची पावले दिसतात। सारा आसमंत(त्रैलोक्य) पांडूरंगाच्या स्वरुपाने व्यापला आहे असे वाटते। अनुरेनु सुद्धा वेगला भासत नाही। (सर्व गोष्टीत पांडुरंग दिसत आहे) पांडूरंगाचे रूप एवढे मनात बसले आहे की आकाशही ठेन्गने वाटते।